
टरेट फार्मातर्फे आयोजन, पहिल्या हंगामात एकूण १० संघांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर ः टरेट फार्मातर्फे अॅशेस फार्मा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा टी २० पद्धतीने आणि पिंक बॉलवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा हा पहिला हंगाम असून या हंगामाची २४ ऑक्टोबरपासून शानदार प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेला आयकॉन हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले आहे.

अॅशेस फार्मा लीग टी २० स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघांचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा एमजीएम क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. येत्या २४ ऑक्टोबर २०२५ पासून अॅशेस फार्मा लीगचा पहिला हंगाम सुरू होणार आहे. या लीगसाठी एकूण १५० खेळाडूंची निवड लिलाव प्रक्रियेतून करण्यात येणार आहे.
अॅशेस फार्मा लीग टी २० स्पर्धेचे आयोजन सय्यद फिरदोस, डॉ अल्ताफ शेख, अफरोज शेख यांनी केले आहे. दहा संघांमध्ये रंगणारी ही टरेट फार्मा प्रस्तुत अॅशेस फार्मा लीग रोमांचक ठरणार यात शंकाच नाही. या स्पर्धेची उत्सुकता आता वाढली आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ आणि संघ मालक
१) आयकॉन हॉस्पिटल – डॉ अल्ताफ शेख
२) वैद्यनाथ हॉस्पिटल – डॉ संदीप सानप
३) टीम किल बिल हॉस्पिटल – डॉ तौसिफ खान
४) बियाबानी दंत चिकित्सालय (बीडीसी योद्धा) – डॉ अहमद बियाबानी
५) नारायणी हॉस्पिटल – डॉ विक्रम लोखंडे
६) आयआयएमएसआर (बदनापूर रुग्णालय) – डॉ जवाद हाश्मी
७) शिवना हॉस्पिटल – डॉ रणजित गायकवाड
८) आशियाई रुग्णालय – डॉ शोएब हाश्मी
९) टीम केडीओसी कासुडीकर कॅन्सर क्लिनिक – डॉ श्रीपाद कौसौडीकर
१०) बदाम दंत चिकित्सालय – डॉ आमेर बदाम