
बॉक्सर पंखुडी सारसरला सुवर्णपदक
धुळे ः जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मीडियम स्कूल व केव्हीपीएस बॉक्सिंग क्लब शिरपूर या संस्थेची विद्यार्थिनी पंखुडी बंटी सारसर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधित्व करत पंखुडीने कठोर मेहनत, अचूक कौशल्य व जिद्द यांच्या जोरावर सर्व लढती जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल पंखुडीचा सन्मान अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक एस. के. पाल यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी तिला पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयामागे संस्थेचे बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, महिला प्रशिक्षक पूनम उठवाल, तसेच ओम राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे आणि किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, क्रीडा संचालक डॉ एल के प्रताळे, संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा राकेश बोरसे, मुख्याध्यापिका कामिनी पाटील, समन्वयक प्रमोद पाटील, संघटनेचे सचिव मयूर बोरसे तसेच सर्व व्यवस्थापक प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, सहकारी व क्रीडा प्रेमींनी तिचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.