जळगाव येथे टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा व कार्यशाळा उत्साहात संपन्न

  • By admin
  • August 6, 2025
  • 0
  • 86 Views
Spread the love

जळगाव ः टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन आणि या खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनानिमित्त जळगाव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल पंच परीक्षा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, राज्य सचिव गणेश माळवे, उज्वल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ व्यंकटेश वांगवाड म्हणाले की, खेळात खेळाडू सोबत पंच महत्वाचा घटक आहे. खेळातील न्याय देणारा महत्वाचा घटक मानला जातो. पंचांनी आपला निर्णय योग्य द्यावा, कारण त्यावर खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्रशांत कोल्हे यांनी केले. आंतरराष्ट्रीय पंच प्रफुल्ल कुमार बनसोड यांनी टेनिस व्हॉलीबॉल इतिहास, नियम नियमावली, पंचांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पंच समिती सचिव निलेश माळवे यांनी पंचांना गुणपत्रक बाबत माहिती दिली.

यात महाराष्ट्रातील ४५ क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. पंच-क्रीडा शिक्षक यांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा सचिव संदीप पाथरे, तुषार देशमुख, रामा हटकर, संदीप भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *