
गायत्री बाविस्करची कांस्य पदकाची कमाई
छत्रपती संभाजीनगर ः भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे नुकत्याच झालेल्या सीबीएसई साऊथ झोन २ स्पर्धेत ग्लॅडिएटर्स बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले. त्यात तन्मय गोरे व नमस्वी अंभोरे यांनी सुवर्णपदक आणि गायत्री बाविस्कर हिने कांस्य पदक संपादन केले.
लाखनी, भंडारा येथे पार पडलेल्या सीबीएसई साऊथ झोन २ स्पर्धेत तन्मय गोरे याने १४ वर्षांखालील वयोगाटत आणि ४६-४८ किलो वजन गटात क्षितू उपर्वात तसेच ख्रिस्ती गिर्ल यांना पराजित करून सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नमस्वी अंभोरे हिने साची राव, स्नेया फलके व अंतिम फेरीत रिया जाधव या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांचा एकतर्फी पराभव करुन नमस्वी हिने आपल्या राष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग मोकळा केला.
पदक प्राप्त खेळाडूंचे ग्लॅडिएटर्स बॉक्सिंग अकादमीचे आधारस्तंभ दादाराव पखे पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव नील पाटील, विभागीय सचिव आणि भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक धनंजय बनसोडे, सहसचिव अरुण भोसले पाटील, पिसादेवी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष संजीव पखे पाटील, सुनील मगर, हांडे मॅडम आदींनी अभिनंदन करून हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीबीएससी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.