
यवतमाळ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पांढरकवडा तालुक्यातून २५० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेमध्ये डॉक्टर यार्डी इंग्लिश मीडियम स्कूल उमरीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात योशिता अभय निकोडे हिने तालुका स्पर्धेत प्रथम व सय्यम मुथा हिने द्वितीय, जय खत्री याने चतुर्थ क्रमांक तसेच १७ वर्षांखालील गटात वासवी कैलासवार हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक गौरव ढवक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजयी झालेल्या खेळाडूंचे डायरेक्टर समुईल जीवागणं, पर्यवेक्षिका के शिल्पा, प्राचार्य सेलास्तीन सेलवा राजा, अश्विन राठोड, राहुल चव्हाण, आशिष सिडाम यांनी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेकरिता गिरीश वैद्य, तालुका क्रीडा संयोजक सुनील कोपुलवार, मदन जिद्धेवार, रितेश मुपिद्दूवार या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.