< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); तायक्वांदो स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाला ४९ पदके  – Sport Splus

तायक्वांदो स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाला ४९ पदके 

  • By admin
  • August 7, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

जळगाव ः अमरावती येथे झालेल्या ओपन युथ फायटर तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण, १५ रौप्य, १९ कांस्यपदके पटकावून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले.

ही स्पर्धा युथ स्पोर्टस्  फाउंडेशन अमरावतीच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत जळगाव, अहिल्या नगर, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. 

विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, दानिश तडवी, गिरीश खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. पंच म्हणून जयेश बाविस्कर, स्मिता बाविस्कर, निकेतन खोडके, जीवन महाजन यांनी काम पाहिले.खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे. 

पदक विजेते खेळाडू

सुवर्णपदक विजेते ः दर्शन कानवडे, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, क्षितिज बोरसे, प्रणव भोई, कोमल गाढे, निकिता पवार (जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव), पुष्कर पिसे, भूमिका सोनवणे, वेदिका पाटील, भूमी कांबळे (पँथर तायक्वांदो अकॅडमी, बोदवड), संकल्प गाढे, अमर शिवलकर, त्रिशा झिरमाळी, गना टी मनू (सर्व रावेर).

रौप्य पदक विजेते ः मयुर पाटील, देवयानी पाटील, निकिता पवार, मयुर पाटील ( जैन स्पोर्ट्स अकॅडमी), पार्थ माळी, साहिल खराते, आम्रपाली खराते, आरोही पवार (पँथर तायक्वांदो अकॅडमी, बोदवड), युग महाजन, मयांक खराळे, सम्राट गुमळकर, दिनेश चौधरी, कश्मिरा तडवी, हंसिका बारी, नंदिनी रूळे (सर्व रावेर)

कांस्यपदक विजेते ः दानिश तडवी, सिद्धी पाटील, गुरू कारंडे, मानसी कारंडे, आरोही गवळे (जैन स्पोर्ट्स अकॅडमी), कोमल ढाके, सानवी सुरडकर, दीक्षा कांबळे, तेजल ढाके, मधुरा राणे, आचल इग्लंस, ब्लेसी पांडे, प्रशंसा मोरे(पँथर तायक्वांदो अकॅडमी, बोदवड), सूर्यांश चावरे, आशिष फुलमाळी, शुभम शिवलकर, समर्थ तायडे, रोशन गाढे, प्रणव गाढे (रावेर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *