मुंबई ः दादर पूर्व येथील शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी लहान वयोगटातील मुला-मुलींसाठी शिवनेरी रोड रेसचे आयोजन मुंबई शहर जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
शिवनेरी रोड रेस ही १०, १२, १४, १६ वर्षांखालील गटात होणार आहे. या शर्यतीला शुक्रवारी सकाळी सहा वाजता भवानी माता मैदान, शिंदे वाडी, दादर पूर्व येथून सुरुवात होईल. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील धावपटू या रेसमध्ये भाग घेऊ शकतील. अधिक माहितीसाठी ९७६९५९१४१३ अथवा ९८२१३९४७१२ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.