डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे आयोजन
डेरवण ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे डेरवण येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेदरम्यान विजेत्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्रके देवून गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा १२, १४, १६, १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी आयोजित केली असून १२ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांस २ किलोमीटर, १४ वर्ष वयोगटातील मुले यांस ३ किलोमीटर व मुली २ किलोमीटर, १६ वर्ष वयोगटातील मुले यांस ४ किलोमीटर व मुली ३ किलोमीटर तसेच १८ वर्ष वयोगटातील मुले यांस ६ किलोमीटर व मुली ४ किलोमीटर अंतर असणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टी -र्ट देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून बलोपासना आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थे मार्फत करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील आपला सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट असून अधिक माहिती करता ९८२२६३९३०६ / ९८५०८८३२८३ / ८८०५२२८९२२ / ९३२५८९७८७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.