< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); सिद्धनाथ वाडगाव येथील विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या – Sport Splus

सिद्धनाथ वाडगाव येथील विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या

  • By admin
  • August 7, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

शाळेचा मागील दहा वर्षांपासूनचा स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर ः गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेमध्ये स्वतःच्या हाताने सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी पाठवल्या. 

जे सैनिक आपल्या घरी रक्षाबंधनसाठी येऊ शकत नाही अशा सैनिकांना मागील दहा वर्षांपासूनचा हा एक धागा प्यार भरा हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये विद्यार्थी स्वतः साहित्य विकत आणून त्यापासून राखी बनवतात. जेव्हा ही राखी सैनिकांना मिळते व त्यांचे उत्तर ज्यावेळी पत्रातून मिळते तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

सिद्धनाथ वाडगाव येथील पोस्ट मास्टर तोहीद अली सय्यद यांच्याकडे विद्यार्थ्यांनी भावनिक होऊन राख्या सुपूर्द केल्या. पोस्ट मास्टर यांनी देखील सांगितले की, राख्या लवकरच सीमेवर पोहच होतील. विद्यार्थी अवस्थेपासूनच राष्ट्र भक्ती व सैनिकांविषयी प्रेम हे विद्यार्थीना अवगत झाले पाहिजे याकरिता शाळेचा हा मागील दहा वर्षांपासूनचा उपक्रम प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, मुख्याध्यापक अब्दुल काय्युम खान, भाग्यश्री नरोडे, वंदना कैतके, वंदना चव्हाण, किरण राजपूत, शीतल नरोडे, सोनाली लबडे, अनन्या चव्हाण, श्वेता बत्तीसे, सुरेखा हिवाळे, कोमल काकडे, शिक्षक समीर शेख, दत्तू काळवणे, प्रवीण आळंजकर तसेच शिवनाथ चव्हाण, योगेश देवबोने, गजानन राऊत, अमोल जेजुरकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *