
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचा तेजतर्रार गोलंदाज तन्मय अनंत नेरळकर याची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे व्हिडिओ ॲनालिस्ट म्हणून निवड झाली आहे.
तन्मय नेरळकर हा बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघाचा व्हिडिओ ॲनालिस्ट म्हणून काम पाहणार आहे. या निवडीविषयी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सचिव कमलेश पिसाळ यांचे पत्र तन्मय नेरळकर याला नुकतेच मिळाले आहे. या निवडीबद्धल जिल्हा एमसीएचे सीएसी चेअरमन सचिन मुळे यांनी तन्मय नेरळकरचे अभिनंदन केले आहे.