
मुंबई ः गिरनार चहा पुरस्कृत आणि मुंबई क्रिकेट असोशिएशन मान्यता प्राप्त आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेत ज्या रुग्णालयीन क्रिकेट संघांना सहभागी व्हायचे असेल अशा संघांनी अनिल बैकर यांच्याशी संपर्क करावा.
प्रथम येणाऱ्या १६ क्रिकेट संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल. गेली ३१ वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हुमाँयू जाफरी (सरचिटणीस) आणि मिलिंद सावंत (खजिनदार) आणि त्यांचे सहकारी हे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अथक मेहनत घेत आहेत. फॉर्म पूर्ण भरून प्रवेश फी सहित स्वीकारण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे .स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सहचिटणीस अनिल बैकर (९९८७०३४३८१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.