< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे घवघवीत यश  – Sport Splus

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे घवघवीत यश 

  • By admin
  • August 8, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

ठाणे : प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूल संघाने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली.

या स्पर्धेत ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४८० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्स, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, टीजेएसबी बँक हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात संपन्न झाली. ओंकार इंग्लिश मीडियम स्कूल, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट जॉन बॉस्को हायस्कूल, भारतीय सैनिक विद्यालय आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या शाळांच्या खेळाडूंनी देखील या स्पर्धेत चमक दाखवली.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून चैतन्य सचिन साळवे आणि अर्णव विक्रांत साबळे यांची निवड झाली, तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अॅना अँथनी एन आणि आरोही दीपक नलावडे यांनी हा मान मिळवला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम शेट्टी, ध्रुव शिरोडकर आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिहिका सुर्वे आणि रिद्धी संतोष माने यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटात समर्थ भिंगारदेवे, आयुष पाटील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या हरिचंद्र बांगर यांनी सर्वोत्तम धावपटूंचा मान मिळवला.

गोळाफेकमध्ये १४ वर्षा खालील मुलांच्या गटात राज प्रजापती, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात खुशाल विजेन्द्र तिवारी, आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात स्टॅनिस गोल्डिन क्वाड्रोस यांनी सुवर्णपदके जिंकली.

१४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत रुतुजा दिनेश वारदेकर आणि १७ वर्षांखालील गटात नव्या अनिलकुमार चकूरकर यांनी पहिला क्रमांक मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *