
अर्शिया तडवीची कर्णधारपदी निवड
जळगाव : जळगाव जिल्हा महिला फुटबॉल संघ राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालघरसाठी रवाना झाला आहे. या संघामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडूंचा समावेश असून त्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महिला फुटबॉल संघाच्या रवाना होण्याच्या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक मुझफ्फर अली सय्यद यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच सचिव फारुक शेख यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
यावेळी फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा अनिता कोल्हे, संचालक ताहेर शेख, अॅड अमीर शेख, मुख्य प्रशिक्षक राहिल अहमद, संघ व्यवस्थापक पंकज तिवारी व प्रशिक्षक मनोज सुरवाडे यांची उपस्थिती होती.
जळगाव महिला फुटबॉल संघात हिमाली विलास बोरोले, ममता जगदीश प्रजापत, वर्षा भगवान सोनवणे, चैताली सुरेंद्र सोनोने, स्वाती रामबहादुर गुप्ता (उप कर्णधार), अरशिया आरिफ तडवी (कर्णधार), भाग्यश्री पुरुषोत्तम दुसाने, संस्कृती सचिन बोरसे, किर्ती भारत भिसे, अंजली अभय सिंग, संपदा मनीष कुलकर्णी, अक्षदा गजानन साळोकार, चैताली गजानन पाटील, पूनम ईश्वर सोनवणे, यशस्विनी चंद्रकांत बोरनारे, देवयानी पितांबर सोनवणे, दिव्या विशाल लिंगायत, अमृता मनोज चौधरी व दीपाली मनोज सुरवाडे या खेळाडूंचा समावेश आहे.