छत्रपती संभाजीनगर ः रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या सहकार्याने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरीय रग्बी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा रग्बी संघ रविवारी (१० ऑगस्ट) निवडण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय रग्बी स्पर्धा १७ आणि १२ वर्षांखालील गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी रविवारी पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात रग्बी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंनी जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड सोबत आणावेत. रविवारी सकाळी नऊ वाजता निवड चाचणी प्रक्रियेला सुरुवात होईल. या निवड चाचणीत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव सूर्यवंशी, सचिव श्याम अंभोरे यांनी केले आहे.