
शिरपूर ः धुळे जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शिरपूर तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर झेप घेतली आहे.
शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा शिरपूर येथील पटेल संकुलात नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील विविध शाळांच्या मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. १४ व १७ वर्षाआतील मुला मुलींच्या गटात तालुक्यातून सुमारे २००हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करत केव्हीटीआर सीबीएसई स्कूलच्या आयुष ग्यानसिंग पावरा याने चौथे स्थान प्राप्त केले, तर १७ वर्षांआतील मुलींच्या गटात शाळेच्या दिशा लिंबाजी प्रताळेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
कॅरम खेळातील या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ कल्पेश वाघ, मुख्याध्यापक निलेश चोपडे, समन्वयक सागर वाघ व संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे उपस्थित होते. खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक नूर तेली, दीपक पवार, नयना माळी, हेमंत शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या क्रीडा विभागाच्या उत्तम कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, विश्वस्त राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, सीमाताई रंधे संस्थेचे सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी व पालक वर्गाने कौतुक केले.