< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); युवती दहीहंडी उत्सव समिती जाहीर – Sport Splus

युवती दहीहंडी उत्सव समिती जाहीर

  • By admin
  • August 8, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

अध्यक्षपदी डॉ कल्याणी नागुलकर व सचिवपदी प्रा क्षमा सराफ यांची निवड

जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट २०२५ रोजी बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) जळगाव येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. 

युवतींच्या दहीहंडीचे यंदा १७ वे वर्ष असून दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते. सदर दहीहंडी उत्सवाची समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ कल्याणी नागुलकर व सचिवपदी प्रा क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

युवती दहीहंडी कार्यकारिणी 

अध्यक्ष डॉ कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष डॉ अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ हेमाक्षी वानखेडे, डॉ कल्याणी मोहरील, सचिव प्रा क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख डॉ सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार नीलम जोशी, सहसचिव हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख यामिनी कुळकर्णी, सदस्य चेतना नन्नवरे, प्रा श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *