< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी संघाला चार पदके – Sport Splus

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी संघाला चार पदके

  • By admin
  • August 9, 2025
  • 0
  • 57 Views
Spread the love

स्पर्धेत रेकॉर्डब्रेक ६५० खेळाडूंचा सहभाग 

परभणी ः जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी जिल्हा संघाच्या सहा बॉक्सरने सहभाग नोंदवून सहापैकी चार पदक मिळवली अशी माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव धनंजय बनसोडे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटना यांनी आयोजित केलेली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. पंधरा वर्षांखालील मुला-मुलींच्या व १३ व ११ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत परभणी जिल्हा संघाने दोन सुवर्ण व दोन रौप्य पदक पटकावले आहेत. 

गेल्या चार वर्षांत या वयोगटात स्पर्धा आयोजित होत नसल्यामुळे या वयोगटातील खेळाडूंचे प्रचंड नुकसान होत होते. पण महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना कमिटी अंतर्गत आयोजित या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक ६५० खेळाडू सहभागी झाले होते. प्रचंड स्पर्धा असताना देखील परभणी जिल्हा संघाने चार पदक पटकावली हे सगळे श्रेय बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणजे धनंजय बनसोडे व सहाय्यक प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू मोनाली धनगर यांच्या मार्गदर्शनाला जाते.

या स्पर्धेत तनिष्का डापकर, श्रेयस सोनवणे, शांभवी गळाकाटु, ओजस महाराज, श्रेयस गळाकाटु, श्रेया सोनवणे, श्रीनिवास मुंढे हे सर्व खेळाडू प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील धनंजय बॉक्सिंग अकॅडमीमध्ये नियमित सराव करतात.

या यशाबद्दल परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय तिवारी, किशोर ढोके, राजेश्वर मठ्ठपल्लु, शुभम मुंदडा, ओम संदेश ऐडके, संजय मुंढे, सुयश नाटकर, रोहन औंढेकर आदींनी कौतुक केले  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *