
पुणे ः महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगवी येथील लक्ष्मण जगताप कला क्रीडा अकॅडमीची खेळाडू शुभ्रा युवराज गायकवाड हिने कॅडेट गटात ४५ ते ५० किलो वजन गटात अंतिम फेरीत जळगावच्या खेळाडूवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
ही स्पर्धा जळगाव येथे पार पडली असून राज्यभरातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या यशामुळे पिंपरी चिंचवडचे नाव राज्यपातळीवर उज्वल झाले असून क्रीडा प्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिला प्रशिक्षक संदीप धंदर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिला पालक आणि लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलचे प्रोत्साहन लाभले.