
पुणे ः गोविंदा गार्डन मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या विनायक निम्हण स्मृती दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रायगडच्या राजेश गोहिलने पुण्याच्या फैयाज शेखचा १९-१२, २५-८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने पुण्याच्या वासिम शेखचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२५, २५-६, २१-९ असा पराभव करून चौथी फेरी गाठली.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल
प्रशांत मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध नंदू सोनावणे (पुणे), महम्मद घुफ्रान (मुंबई) विजयी विरुद्ध कमलेश राठोड (मुंबई), हिदायत अंसारी (मुंबई) विजयी विरुद्ध सुखबीरसिंग कटनोरिया (पुणे), अभिजित त्रिपनकर (पुणे) विजयी विरुद्ध रवी धिंग्रा (पुणे), रियाझ अकबर अली (रत्नागिरी) विजयी विरुद्ध निकुल काकडे (पुणे), इकबाल कुरेशी (पुणे) विजयी विरुद्ध महम्मद वाजिद पाशा (नांदेड), नीरज कांबळे (मुंबई) विजयी विरुद्ध रहीम करीम खान (पुणे), नीलांश चिपळूणकर (मुंबई) विजयी विरुद्ध रहीम हजारी शेख (पुणे), योगेश परदेशी (पुणे) विजयी विरुद्ध रोहित मिरजकर (पुणे), सागर भोसले (पुणे) विजयी विरुद्ध अमोल सावर्डेकर (मुंबई), आयुष्य गरुड (पुणे) विजयी विरुद्ध जाफर शेख (पुणे).