< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); संभाजीनगर अॅथलेटिक्स निवड चाचणी १७ ऑगस्टला – Sport Splus

संभाजीनगर अॅथलेटिक्स निवड चाचणी १७ ऑगस्टला

  • By admin
  • August 9, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय मैदानावर आयोजन

छत्रपती संभाजीनगर ः ३९व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय निवड चाचणी १७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे.

छावणी भागातील पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या क्रीडांगणावर १७ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया येत्या ३९व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व इच्छुकांनी आपली नोंदणी १४ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण करावी. स्पर्धेचे ठिकाण पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडा मैदान आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ दयानंद कांबळे (९८३४८४१६१८) आणि तुषार खेडळकर (७३५०९०८०२१) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत खेळाडूंनी मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष माजी माजी आमदार श्रीकांत जोशी व सचिव डॉ फुलचंद सलामपुरे यांनी केले.

निवड चाचणी विविध वयोगटांमध्ये घेतली जाणार

  • अंडर १४ (वयोगट : १५/१०/२००९ ते १४/१०/२०१३) :
    स्पर्धा प्रकार – त्रायथलॉन ए, बी, सी (६० मीटर, लांब उडी, ६०० मीटर)
  • अंडर १६ (वयोगट : १५/१०/२००९ ते १४/१०/२०११) :
    स्पर्धा प्रकार – ६० मीटर, ६०० मीटर, लांब उडी, गोळा फेक, भालाफेक, पेंटाथलॉन
  • अंडर १८ (वयोगट : १५/१०/२००७ ते १४/१०/२००९) :
    स्पर्धा प्रकार – १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, १००० मीटर, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक
  • अंडर २० (वयोगट : १५/१०/२००५ ते १४/१०/२००७) :
    स्पर्धा प्रकार – १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, ३००० मीटर, ५००० मीटर, १०,००० मीटर, लांब उडी, ट्रिपल जंप, गोळा फेक, थाळी फेक, हॅमर थ्रो, भालाफेक, १० किलोमीटर रेस वॉक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *