
श्रावणी सूर्यवंशी, मनस्वी माने तिहेरी सुवर्ण पदकाचे मानकरी
सोलापूर ः अखिल भारतीय जलतरण महासंघाच्या वतीने बंगळुरू येथे झालेल्या कनिष्ठ व उपनिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूरच्या डायव्हिंग खेळाडूंनी सात सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी १० पदके पटकाविली.
यात श्रावणी सूर्यवंशी व मनस्वी माने यांचा प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. वंशिका चुंगीवडियार हिने एक सुवर्ण व एक कांस्य पदक संपादिले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी व १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मनस्वी यांनी डायव्हिंगमधील हाय बोर्ड, एक मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. रणवीर खाडे याने एक मीटर स्प्रिंग बोर्ड व हायबोर्ड या प्रकारात दोन रौप्य मिळविली. त्यांना प्रशिक्षक श्रीकांत शेटे, मनीष भावसार व केशव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सहभागी खेळाडू
मुले : संकेत लिगाडे, वेदांत बांदल, अंश तिलोटिया, श्रीगणेश उडता, वेदात चिलवेरी. मुली : अपूर्वा अंधारे, रिया वदूल, मनस्वी सावंत, त्रिवेणी खांडेकर.