
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव ः खेलो इंडिया, क्रीडा व युवा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय फुटबॉल संघटना यांच्या मान्यतेने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित अस्मिता फाउंडेशन पुरस्कृत १३ वर्षांखालील अस्मिता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने १० ऑगस्ट (रविवार) रोजी गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर करण्यात आहे.
क्रीडा राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन
या एक दिवसीय आठ संघाच्या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा खात्याच्या राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी साडेनऊ वाजता होत आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू मामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील व जागतिक कॅरम विजेती व शिवछत्रपती अवार्डी आयशा खान यांची उपस्थिती लाभणार आहे.
या आठ संघांमध्ये होणार युद्ध
पोदार इंटरनॅशनल स्कूल, गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी स्कूल, नानासाहेब तामसवाडी फुटबॉल क्लब, जळगाव फुटबॉल अकॅडमी, अक्सा फुटबॉल क्लब, पोदार फुटबॉल अकॅडमी व ताप्ती फुटबॉल क्लब भुसावळ या आठ संघांमध्ये एक दिवसीय बाद पद्धतीने या स्पर्धा होत आहे.
विविध पारितोषिके
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे विजेता, उपविजेता संघास फुटबॉल चषक तसेच सुवर्ण व रौप्य पदक दिले जाणार असून तृतीय संघाला सुद्धा ट्रॉफी देण्यात येईल. प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. एम संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट गोल करणारा व सर्वात्कृष्ट शिस्तप्रिय खेळाडू अशा स्वरूपाचे पारितोषिक खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
१३ वर्षांखालील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना प्रतिनिधी यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.