
सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या पृथ्वीराज निलेश शिंदे या पॉवर लिफ्टिंग खेळाडूने ‘पॉवरलिफ्टिंग इंडियाने’ आयोजित केलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
जिजाऊ हॉल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्कॉट प्रकारात २८५ किलोग्रॅम, बेंचप्रेस १५५ किलोग्रॅम व डेडलिफ्ट २८५ किलोग्रॅम वजन उचलून असे एकूण ७२५ किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक पटकावले. सदर खेळाडू प्रशिक्षक रितेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
खेळाडूच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या हस्ते ट्रॉफी व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ, प्रा सचिन कुमार शाह, डॉ नितीन लगड, प्रा वैशाली शेरकर व मच्छिंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.