
रायगड ः महाराष्ट्र राज्यस्तरीय मिक्स-बॉक्सिंग रेफ्री सेमिनारचे आयोजन रायगड येथे यशस्वीरित्या करण्यात आले होते. या सेमिनारला मोठा प्रतिसाद लाभला.
ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग रेफ्री सेमिनार रोहा तालुका क्रीडा संकुल, धाटव, जिल्हा-रायगड या ठिकाणी आयोजित केले होते. या सभेचे संपूर्ण नियोजन रायगड जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विकास भोईर व सचिव मुकेश भगत तसेच जिल्हाप्रमुख अतिश साळवी, रोहा तालुका अध्यक्ष रोहन शेवाळे व महाराष्ट्र पंच प्रशिक्षक विनायक सकपाल यांनी उत्तम प्रकारे केले होते.
या सेमिनारला तालुका क्रीडा अधिकारी रवींद्र कानेकर, भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव राकेश म्हसकर, सदस्य अश्विनी चौहान, प्रणाली पाटील व विनायक सकपाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रेफ्री सेमिनार ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते व महासचिव नारायण कराळे, महाराष्ट्र तांत्रिक संचालक सागर शेलार, डेव्हलपमेंट इन्चार्ज रवी बारापात्रे व महाराष्ट्र आयोजन समिती अध्यक्ष गणेश पेरे यांच्या देखरेखीखाली पार पडले. हे प्रशिक्षण अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडले. मिक्स बॉक्सिंग खेळाचा प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त कसा प्रचार-प्रसार व विकास होईल यावर चर्चा झाली.
या सेमिनारमध्ये महाराष्ट्रातून सुमारे १० ते १५ जिल्ह्यांनी सहभाग घेतला. या सेमिनारमध्ये पारस कांबळे (पुणे), सिद्धी पंकज क्षीरसागर (पुणे), प्रियंका शरद बोडके (पुणे), सुरज कदम (पुणे), विनोद प्रल्हाद दाढे (नांदेड), आर्यन कानोबा कांबळे (नांदेड), हितेश रामचंद्र भगत (अलिबाग), निर्मळ परेश पाटील (अलिबाग),
वैदेही हिराचंद पाटील (अलिबाग), प्रिया उमेश तावडे (अलिबाग), भार्गवी रंजीत म्हात्रे (अलिबाग), पवनता सुनील पवार (रायगड), मनस्वी रमेश तांडेल (रायगड), कीर्ती कृष्णा तांडेल (रायगड), विकास भोईर (रायगड), दीपक घरत (रायगड), प्रगती भोईर (रायगड), सुबोध शिंदे (रायगड), उत्कर्ष घाणेकर (रायगड), योगेश वरगुडे (रायगड), भाग्यश्री मोरे (रायगड), सुरज कुश्वा (रायगड), वंदना कतोरे (बुलढाणा), आनंद जाधव (नाशिक), मयंक सक्सेना (नाशिक), मंगेश इटखडे (बुलढाणा) यांनी सहभाग घेतला होता.
भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा मंत्री अदिती तटकरे, ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे व महासंघाचे चेअरमन सुरज मगर, तालुका क्रीडा अधिकारी रवींद्र कानेकर, भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव राकेश म्हसकर, सदस्य अश्विनी चौहान, प्रणाली पाटील व विनायक सकपाल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.