
शिरपूर ः किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगरसेवक रोहित रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर क्रीडा मंडळ आयोजित १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत तऱ्हाडी येथील कर्मवीर क्रीडा मंडळ संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचा अंतिम सामना कर्मवीर क्रीडा मंडळ तऱ्हाडी संघ आणि पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय बोराडी संघ असा झाला. अटीतटीचा सामन्यात तऱ्हाडी संघ सरस ठरला आणि या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बोराडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि तिसरा क्रमांक अर्थे येथील कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयाच्या संघाने मिळवला.
या कबड्डी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, नगरसेवक रोहित रंधे, एसपीडीएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ दिनेश भक्कड, डॉ आबासाहेब देशमुख, लोकमाता अहिल्याबाई होळकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ महेश पवार, डॉ पा रा घोगरे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विलास चव्हाण, केव्हीटीआर स्कूलचे मुख्याध्यापक निलेश चोपडे, डॉ व्ही व्ही रंधे स्कूलच्या मुख्याध्यापिका कामिनी पाटील, सारिका ततार, प्रा प्रशांत पाटील, डॉ विवेकानंद, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी डॉ तुषार रंधे हे होते. स्पर्धेचे उद्घाटन रोहित रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना डॉ. तुषार रंधे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ‘खेळाडूंनी मैदानावर वेळ द्यावा, मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करावी शरीराने निरोगी रहावे, खेळातून मैत्रीपूर्ण वातावरण तयार करावे’, असे मार्गदर्शन केले.
या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस समारंभ एसपीडीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस राजपूत, किसान विद्या प्रसारक संस्थेचे व्यवस्थापक के डी बच्छाव, युवा उद्योजक आणि कर्मवीर क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष हर्षवर्धन रंधे, शिरपूर परिसराचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल पावरा, तऱ्हाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातून आमंत्रित एकूण ८ संघातील १२० खेळाडू सहभाग नोंदवला. पंच म्हणून सागर पारधी, विशाल शिंदे, आकाश कोळी, संदीप कोळी, मच्छिंद्र पिंपळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हेमंत शिरसाठ, मुकेश पारधी, अमोल गिरासे, विजेंद्र जाधव, संजय मोते, राहुल कोळी, भरत मराठे, नूर तेली, दीपक पवार, नयना माळी, गिरीश बैसाणे यांनी मेहनत घेतली. तांत्रिक कार्य उमेश पावरा यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दिनेश भक्कड यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे, प्रा. राधेश्याम पाटील, प्रा. राकेश बोरसे, क्रीडा शिक्षक हेमंत शिरसाठ यांनी केले.
कर्मवीर क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्याबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक यांचे कर्मवीर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रोहित रंधे यांनी अभिनंदन केले आहे.