
दिंडोरी ः जऊळके वणी दिंडोरी या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कूलच्या एकूण १६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात ८ खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कूलच्या कुस्तीपटूंनी शानदार कामगिरी बजावली. या स्पर्धेत मानव विलास मुळाने (३८ किलो), संग्राम आशिष चौधरी (४१ किलो), श्रावणी संदीप तांबडे (५८ किलो), आयुष दीपक बोरस्ते (६० किलो), वेदश्री नितीन देशमुख (४० किलो), मृणाली अरुण खेळकर (४६ किलो), अक्षदा किरण दोखळे (४९ किलो), गौरी शामराव काळोगे (५३ किलो) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत यश संपादन केले.
या स्पर्धेत साई संजय देशमुख, संस्कार संदीप मेधने, दर्शन किशोर चारोसे, प्रथमेश गणेश रायते, आदित्य अनिल वडजे, वैष्णवी विनायक जाधव, ईश्वरी दिलीप पताडे, श्रेया समाधान चौधरी या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या कामगिरीबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रीतम प्रकाशराव देशमुख, सुयोग सुभाष धोंगडे (उपाध्यक्ष), विलास एकनाथ देशमुख (खजिनदार), संदीप बाळकृष्ण शेटे (सचिव) यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अनिता गणोरे, संदीप बोरसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.