
सोलापूर ः यश ढोकरे व अनुष्का घोडके यांची अनुक्रमे १८ वर्षांखालील मुले व मुली गटाच्या सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे १४ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या राज्य स्पर्धेत दोन्ही संघ सहभागी झाले आहेत. दोन्ही संघास सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. पाटील, मनोज यलगुलवार, दिनेश सारंगी, सचिव साकिब शेख, अभिजीत टाकळीकर, रंजिता चाकोते, मुकीम खान, वलजा घुमे, राष्ट्रीय खेळाडू विकी गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोलापूर बास्केटबॉल संघ
मुले : यश ढोकरे (कर्णधार), जैद सैय्यद, अब्दुल खालिद काझी, सुभान तुळजापूर, ओम इंगळे, अदनान शेख, जबी हत्तुरे, रियान मुजावर, श्रेयश साळुंखे, अबूतल्हा पठाण, मोहम्मद इनामदार, अर्श शेख. प्रशिक्षक – नावेद मुन्शी.
मुली : अनुष्का घोडके (कर्णधार), सृष्टी ढोकरे, गार्गी देशपांडे, भोमिका सोनकुसरे, यशमिता लीला, सिया कांबळे, अर्चना रांगडाळ, शर्यशी पवार, निहारिका मोने, निहारिका गुंडेटी, अहिरा, श्रियशी. प्रशिक्षक- ताबीश दौलताबादकर.