सोलापूर ः सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल असोसिएशनच्या वतीने १४ व १७ वर्षे मुले व मुली बेसबॉल जिल्हा आमंत्रित स्पर्धा बुधवारी (१३ ऑगस्ट) विमानतळसमोर मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरेनगर येथे सकाळी ९.३० वाजता वाजता होणार आहे.
या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षकांनी संघाची यादी, खेळाडूंची आधार कार्डची झेरॉक्स व आवश्यक साहित्यांसह मैदानावर उपस्थित रहावे. खेळाडूंनी मैदानावर संघटनेचे जिल्हा सचिव प्रा संतोष खेंडे (9850666795) अथवा गंगाराम घोडके (9423717277) यांच्याशी संपर्क साधावा.
विजेत्या खेळाडूंना महादेव बिराप्पा घोडके स्मृती महादेव चषक प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीए विनोद भोसले, उपाध्यक्ष प्रा संतोष गवळी यांनी केले आहे.