सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचा गौरव

  • By admin
  • August 10, 2025
  • 0
  • 93 Views
Spread the love

सातारा ः सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना क्रीडा शिक्षक संघटना वतीने सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे जिल्ह्यातील गोर गरीब वंचित तसेच ग्रामीण भागातील खेळाडूना खेळाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रेरणा देण्याबरोबरच त्यांच्या कागदोपत्री कामासाठी कार्यालयीन दिवसांसोबतच शनिवारी, रविवारी अगदी सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध असतात. सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणारे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय ठरले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडू घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सातारा जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संकुलांमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, युवा खेळाडूंना प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि खेळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यात अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. क्रीडा क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचे कार्य त्यांच्यामुळे शक्य होत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट झाली आहे.

आपल्या मार्गदर्शन व उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आणि खेळाडूंना विशेष प्रोत्साहनातून त्यांच्या कार्यकाळात जिल्हाला दोन अर्जुन पुरस्कार, ८ शिवछत्रपती पुरस्कार तसेच जिल्ह्यातील शेकडो खेळाडूना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत साताऱ्याच्या खेळाडूला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही सातारा खेळाडूनी सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत. यासाठी खेळाडूना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन यशस्वी प्रयत्न केले आहेत. खेळाडू व क्रीडा शिक्षक यांचेसाठी सतत मदत व मार्गदर्शन करीत असतात जिल्ह्यातील गरजू, अनाथ, वंचित तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना नेहमीच सहकार्य असते. याबद्दल क्रीडा संघटनेमार्फत ज्ञानदीपचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रा दत्तात्रय वाघचवरे, प्राचार्या शुभांगी पवार, प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर, विभागीय क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष आर वाय जाधव, तालुका अध्यक्ष सचिन लेंभे, जिल्हा परिषद क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, श्रीगणेश शेंडे, विशाल सोनवणे व पदाधिकारी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *