
अध्यक्षपदी सतीश इंगळे व सचिवपदी प्रा शालिनी जयस्वाल (आंबटकर)
धुळे ः महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनची सन २०२५ ते २०२९ या पाच वर्षांकरीता नुकतीच निवडणूक पार पडली. त्यातील सर्वच अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले. सतीश इंगळे यांची अध्यक्षपदी आणि शालिनी जयस्वाल यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
वर्धा येथील महात्मा मंगल कार्यालयात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी अॅड हरीष चांडक यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भारतीय नेटबॉल फेडरेशनचे सहसचिव, निरीक्षक विक्रम आदित्य रेड्डी, अॅड हाॅक कमिटीचे अध्यक्ष डॉ एस नारायण मूर्ती, संयोजक ऋतुराज यादव, सदस्य पवनकुमार पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात अध्यक्ष सतीश जगन्नाथ इंगळे (छत्रपती संभाजीनगर), उपाध्यक्ष योगेश वालचंद वाघ (धुळे), मिनेश दिनकर महाजन (संगमनेर), सचिव प्रा शालिनी जयस्वाल (आंबटकर) चंद्रपूर, सहसचिव सुशांत विलास सूर्यवंशी (सांगली), नरेश श्रीधर कळंबे (यवतमाळ), खजिनदार विनय मून (वर्धा), सदस्य शोभा मठपती (लातूर), शशीकला शालीयान (मुंबई), अमोल उरसाल (बुलढाणा), शेख चांद (जालना) यांचा समावेश आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांचे नेटबॉल डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन हरीओम कौशिक, नेटबॉल फेडरेशन इंडियाच्या अध्यक्षा सुमन कौशिक, महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष डॉ दिलीप जयस्वाल, सचिव डॉ ललित जिवानी राज्यातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.