
नाशिक ः नाशिक शहरात नऊ ऑगस्ट रोजी डॉ मुस्तफा रन आयोजित करण्यात आली होती. यात अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.
या रनचा उद्देश फक्त एकच होता आपण धावलो कसे पाहिजे. जे नवीन धावपटू आहेत त्यांनी धावण्याची सुरूवात कशी केली पाहिजे, रिकव्हरी कशी केली पाहिजे, आहार काय व कशा प्रकारे घ्यावे याविषयी सविस्तर माहिती धावपटूंना मिळावी हा डॉ मुस्तफा रनचा उद्देश होता. त्यात राष्ट्रीय फिजिओथेरपीस्ट डॉ मुस्तफा टोपीवाला यांचे सर्वांना मोलाचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती साई खेलो इंडिया कोच मंगेश राऊत यांनी दिली.