
जालना ः जालना जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि साई काणे क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर मान्सून क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये पाच संघांनी सहभाग घेतला होता. साखळी पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार, बॅट्समन ऑफ दि टूर्नामेंट, बॉलर ऑफ दि टूर्नामेंट अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नरेंद्र देशपांडे, खजिनदार अॅड श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स मेंबर व टूर्नामेंट कमिटीचे सेक्रेटरी राजू काणे, जॉईंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण, संतोष भारोटे, जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडू व त्यांचा पालक वर्ग मोठ्या प्रमाणे उपस्थित होता.