
ठाणे ः शोतोकान कराटे असोसिशन इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धा कोळी समाज हॉल ठाणे येथे पार पडली. या स्पर्धेत शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वासिंदच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत सातवी इयत्तेत शिकत असलेल्या धृती हालके हिने १२ वर्षे वयोगटात ४० किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले. हंसिका मारुती पाटील हिने १२ वर्षे वयोगटात ५० किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळविले. नमन दिनेश पाटील हिने ८ वर्षे वयोगटामध्ये रौप्य पदक मिळवले. जय हिवाळे याने ३० किलो वजन गट व वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने १२ वर्षे वयोगटात ४५ किलो वजन गटामध्ये कांस्य पदक मिळवून शाळेचे नावलौकिक वाढवला.
सर्व विद्यार्थी व क्रीडा शिक्षक दौलत चव्हाण यांचे विठ्ठल सातवी, चेअरमन विद्या विकास मंडळ वासिंद तसेच रविंद्र शेलार, सेक्रेटरी, विद्या विकास मंडळ, वासिंद सर्व संचालक, प्राचार्य प्रशांत जाधव यांनी अभिनंदन केले आणि कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.