
नाशिक ः जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘आदिवासी नायक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आले होते. या सोहळ्यात अॅथलेटिक्स प्रशिक्षक आणि संघटक मंगेश राऊत यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय, सांस्कृतिक व कला क्रीडा या क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल विशेष आदिवासी जीवनगौरव पुरस्काराने मंगेश राऊत यांना सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते मंगेश राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यिक डॉ गोपाळ, शाहू खैरे, गवारी, संघटनेचे पदाधिकारी महिला अध्यक्ष सविता ससाणे, सुनील शिंदे, गणेश वाघ, विकी मुंजे, प्रकाश कराटे, आकाश दिवे, सोनू गायकवाड हे आवर्जून उपस्थित होते.