
छत्रपती संभाजीनगर ः पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयात येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या परिसराचे वातावरण सुरक्षित व पोषक असावे या अनुषंगाने पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयात अँटी-रॅगिंग सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
सदरील सप्ताह १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित होणार आहे. यामध्ये अँटी-रॅगिंग नारा लेखन, निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर बनविणे, लोगो डिझाइनिंग, स्ट्रीट प्ले परफॉर्मन्स, प्रश्नमंजुषा स्पर्धा, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
अँटी-रॅगिंग सप्ताह उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी, प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, प्रा गौतम गायकवाड, प्रा संतोष कांबळे, प्रा जी सूर्यकांत, प्रा सय्यद मजहर, श्यामला यादव, अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.