
ठाणे ः शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया आयोजित राष्ट्रीय स्तरीय कराटे स्पर्धा कोळी समाज हॉल ठाणे येथे पार पडली. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय वासिंद शाळेची खेळाडू लावण्या सदाशिव सातपुते हिने सुवर्णपदक पटकावले.
इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या लावण्या सातपुते हिने १६ वर्षांखालील ६५ किलो वजन गटात शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिचे व क्रीडा शिक्षक दौलत चव्हाण, क्रीडा प्रमुख सुनील ठाकरे यांचे पर्यवेक्षिक धनगर, भोईर, उपप्राचार्य सापळे, प्राचार्या कांबळे मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच रवींद्र शेलार, सेक्रेटरी विद्या विकास मंडळ, वासिंद, विठ्ठल सातवी, चेअरमन विद्या विकास मंडळ वासिंद सर्व संचालक यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.