< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); बुद्धिबळ स्पर्धेत निर्गुण, परम, कृशिव, रिधम, गोरांक्श, चिराक्षला विजेतेपद  – Sport Splus

बुद्धिबळ स्पर्धेत निर्गुण, परम, कृशिव, रिधम, गोरांक्श, चिराक्षला विजेतेपद 

  • By admin
  • August 13, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

पुणे ः विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल एरंडवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रविवार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत निर्गुण केवल, परम जालान, कृशिव शर्मा, रिधम सेवालिया, गोरांक्श खंडेलवाल, गर्ग चिराक्ष यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले. 

विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे यांच्या सहकार्याने आयोजित ६ रविवार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिरीजचा चौथा टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १५४ बुद्धिबळपटूंनी विविध वयोगटांतून सहभाग घेतला होता. नेहमीप्रमाणेच रिलायन्स मॉल, एरंडवणे हे केंद्रस्थानी, प्रशस्त आणि आकर्षक ठिकाण असल्याने खेळाडू व प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध झाले.

या प्रसंगी आयआयटियन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर, विक्टोरियस चेस अकॅडमीचे संस्थापक व संचालक कपिल लोहाना, प्रसिद्ध बुद्धिबळ आयोजक नागनाथ हळकुडे, श्रीमती तरुण साचार आदी मान्यवर उपस्थित होते. 

बुद्धिबळातील बुद्धिमत्ता, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचा सुंदर संगम, थरारक समाप्ती, हुशार डावपेच आणि परस्पर सन्मान या सर्वांनीच चौथ्या टप्प्याला अविस्मरणीय बनवले. आठवड्यानंतर आठवडा वाढणारा सहभाग आणि उत्साह या स्पर्धा मालिकेच्या यशाची ग्वाही देतो. विक्टोरियस चेस अकॅडमी सर्व विजेते आणि सहभागींचे हार्दिक अभिनंदन करते तसेच रिलायन्स मॉल, एरंडवणे यांचे बुद्धिबळाच्या प्रसारासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या मालिकेतील पाचवा टप्पा ३० ऑगस्ट (शनिवार) रोजी होणार आहे. नोंदणीसाठी संपर्क 8626025502 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

अंतिम निकाल
ओपन गट ः १. निर्गुण केवल, २. अविरत चौहान, ३. विक्रमादित्य कुलकर्णी .
अंडर १५ ः १. परम समीर जालान, २. वरद दिनेश गायकवाड, ३. शेवाळे तनिष्क शैलेंद्र.

अंडर १३ ः १. कृशिव शर्मा, २. सम्यक कुलकर्णी, ३. आरव धायगुडे. 

अंडर ११ ः १. रिधम मिहीर सेवालिया, २. पाटील अनय राहुल, ३. घेलेनी शौर्य.

अंडर ९ ः १. गोरांक्श खंडेलवाल, २. निवान अग्रवाल, ३. श्रीमथ शन्मुख पोलुरी.

अंडर ७ ः १. गर्ग चिराक्ष तरुण, २. सक्षम सौरभ साहा, ३. चेतन कार्तिकेय चावली.

सर्वोत्तम वीसीए खेळाडू

१. प्रथम अमित वारंग, २. विस्मय साचार, ३. अथर्व मुळ्ये.

सर्वोत्तम महिला खेळाडू
१. प्रीतिका नंदी, २. उंडाळे श्रावणी, ३. समृद्धी शशिकांत मक्तेदार.

श्रेष्ठ ज्येष्ठ खेळाडू
१. सुनील वैद्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *