
राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा
पुणे ः कॅडेट मुले, कब क्लास मुले आणि युथ मुलांच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत जळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे निवड चाचणी मंगळवारी अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे पार पडली. या निवड चाचणीत पुणे शहरातील १२ क्लबांनी सहभाग नोंदविला, तर ३८ बॉक्सर निवड चाचणीत उतरले.
निवड समिती
आरओसी कमिटी चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, महाराष्ट्राचे रिंग ऑफिशियल व ज्येष्ठ प्रशिक्षक जीवनलाल निंदाने, वरिष्ठ प्रशिक्षक उमेश जगदाळे, राज्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी ज्येष्ठ प्रशिक्षक नजिर सय्यद, तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश खानेकर यांनी समितीचे काम पाहिले. समितीने वयोगट, वजन गट आणि पात्रता निकष जाहीर केले.
खेळाडूंची निवड त्यांच्या प्रदर्शन, फॉर्म, शारीरिक तयारी व एकूण कामगिरीच्या सखोल परीक्षणावर आधारित होती. रिंगमधील कौशल्य, तांत्रिक तयारी, तसेच मानसिक आणि शारीरिक सहनशक्ती यांचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. यासाठी पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने वस्तुनिष्ठ पद्धतीने चाचणी घेण्यात आली.
विशेष योगदान
महाराष्ट्र संघटनेचे तांत्रिक अधिकारी अशोक मेमजदे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्यकारी सदस्य सुनील काळे,पंच व शहर संघटनेचे समन्वयक प्रदीप वाघे, कोचेस कमिशन चेअरमन पुणे शहर बंडू गायकवाड, महाराष्ट्राचे रिंग ऑफिशियल जयंत शिंदे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सदस्य सुनील काळे, राष्ट्रीय खेळाडू कुणाल पालकर, पुणे रिंग ऑफिशियल रॉबर्ट दास, एनआयएस प्रशिक्षक मृणाल भोसले, राष्ट्रीय बॉक्सर मंगेश यादव यांनी उत्कृष्ट कार्य केले. सर्व निकाल व निरीक्षणांचा बारकाईने आढावा घेऊन अंतिम यादी निश्चित करण्यात आली.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेने ही निवड प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता व निष्पक्षतेने पार पाडली, जेणेकरून पात्र व गुणवंत खेळाडूंनाच संधी मिळेल. सचिव विजय गुजर यांनी निवड समितीचे संपूर्ण कामकाज काटेकोर व प्रामाणिकपणे पाहिले.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी निवड समितीच्या पारदर्शक व निष्ठावान कार्याचे मनःपूर्वक कौतुक करून अभिनंदन केले. तसेच निवड झालेल्या खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये यशाची शिखरे गाठावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
निवड झालेले खेळाडू
अंडर १९ युथ मुले
ओम धमाले (४७ ते ५० किलो), आर्यन शिर्के (५० ते ५५ किलो), स्पर्श परदेसी (५५ ते ६० किलो), अनिकेत जावले (६० ते ६५ किलो), तन्मय जानराव (६० ते ६५ किलो), नागेश देवरे (७५ ते ८० किलो), सिद्धांत गायकवाड (+८० किलो).
अंडर १३ कॅडेट (मुले)
जी पाटोळे (२६ ते २८ किलो), हार्दिक वेंगुर्लेकर (२८ ते ३० किलो), सम्यक कांबळे (३० ते ३२ किलो), पियुष चौधरी (३४ ते ३६ किलो), स्वराज इंगळे (३६ ते ३८ किलो), शुभम परियार (३८ ते ४० किलो), मयंक गायकवाड (४० ते ४२ किलो), शिवराज आंदेकर (४४ ते ४६ किलो).
अंडर ११ कब क्लास मुले
शिवराज महाकाल (२० ते २२ किलो), विहान मगर (२४ ते २६ किलो), विराज कांबळे (२६ ते २८ किलो), आर्यन बेलापूरकर (३४ ते ३६ किलो), साईराज पगारे (३६ ते ३८ किलो), रेयांश सूर्यवंशी (३८ ते ४० किलो).