मुंबई ः जुहू विलेपार्ले जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जुहू विलेपार्ले, जुहू, मुंबई येथे सुरू होत आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात २७२ तर महिला एकेरी गटात ४० खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्व विजेत्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
मानांकन
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) सागर वाघमारे (पुणे), ४) समीर महम्मद अंसारी (ठाणे), ५) रियाझ अकबर अली (रत्नागिरी), ६) प्रफुल मोरे (मुंबई), ७) राहुल सोळंकी (मुंबई), ८) अभिजित त्रिपनकर (पुणे).
महिला एकेरी : १) समृद्धी घाडिगावमर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) मिताली पाठक (मुंबई), ५) अंबिका हरिथ (मुंबई), ६) ऐशा साजिद खान (मुंबई), ७) निलम घोडके (मुंबई), ८) सोनाली कुमारी (मुंबई).