
छत्रपती संभाजीनगर : सीबीएसई क्लस्टरच्या विभागीय ज्युदो स्पर्धेत श्रुतकिर्ती खलाटे व ओम काकड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक पटकावले. सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संचिता गायकवाड, प्रथमेश पवार, अनुज मांडये यांनी रौप्यपदक पटकावले. रिद्धी दाखुरे व गौरी सुरवसे यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
विजेत्या खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, राज्य संघटनेचे महासचिव दत्ता आफळे, उपाध्यक्ष भीमराज रहाणे, सचिव अतुल बामणोदकर, कोषाध्यक्ष विश्वजीत भावे, दीप्ती शेवतेकर, प्रसन्ना पटवर्धन, विश्वास जोशी, सहसचिव अशोक जंगमे, झिया अन्सारी, अमित साकला, दत्तू पवार, विजय शिरसवाल, कुणाल गायकवाड आदींनी अभिनंदन केले.