
नंदुरबार ः फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा फुटसाल असोसिएशनच्या वतीने दुसरी जिल्हास्तरीय फुटसाल अजिंक्यपद स्पर्धा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ११० खेळाडूंनी सहभागी नोंदवला आहे.
नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे रविवारी जिल्हास्तरीय फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा फुटसाल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश भैय्या रघुवंशी, तालुका क्रीडा अधिकारी संजय बेलोकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाश अहिरे हे होते.
या जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील वैयक्तिक शाळेतील ११० खेळाडूंनी सहभागी नोंदवला. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे जिल्हा फुटसाल असोसिएशनचे सचिव रामा हटकर, खजिनदार तुषार सोपनार तसेच या स्पर्धेचे पंच नितीन सोनार, हर्षलसिंग चौधरी, सुरेश परदेशी, अजय गवळी यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जगदीश जाधव, अनुष ठाकुर, गजेंद्र सुळ आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले. जिल्हा फुटसाल असोसिएशनचे खजिनदार तुषार सोपनार यांनी आभार मानले.