
हिंगोली ः महिला सबलीकरण योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश आणि जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.
महिलांचे शिक्षणातील प्रमाण वाढून महिला सबलीकरण होण्यासाठी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना रक्षाबंधनानिमित्त एक दिवसाचा जिल्हाधिकारी, एक दिवसाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, एक दिवसाचा अपर जिल्हाधिकारी, एक दिवसाचा जिल्हा न्यायाधीश, एक दिवसाचा पोलीस अधीक्षक, एक दिवसाचा फॉरेस्ट ऑफिसर अशा विविध पदावर काम करण्याचा अनुभव आज जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांना या पदावर राहून काम करण्याचा अनुभव देण्यात आला.
त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळी (तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली) येथील विद्यार्थिनी नेटबॉलची राष्ट्रीय खेळाडू आर्या रामप्रसाद चव्हाण हिने अपर जिल्हाधिकारी (हिंगोली) म्हणून काम पाहिले. सर्व क्लास वन अधिकारी कशाप्रकारे काम करतात याचा जवळून अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला. याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश तसेच गटशिक्षणाधिकारी औंढा नागनाथ रवी कवडे, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर साखरे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव सारंग, केंद्र प्रमुख माहोरे यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उखळी येथील मुख्याध्यापक मंगेश कुलकर्णी, सरपंच पुंडलीकराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणपतराव गायकवाड, उपसरपंच मुंजाभाऊ मगर, अंगदराव गायकवाड, दीपकराव अंभोरे, रामदास वानखेडे, मनोज टेकाळे, दिनेश सोळंके, रमेश लांबुटे, सिद्धेश्वर भोसले, गोपाल खराटे, संदीप गायकवाड, बापुराव गायकवाड, विष्णू गायकवाड तसेच समस्त गावकरी मंडळी उखळी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.