< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); साक्री येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक शिक्षक संघ सभा उत्साहात – Sport Splus

साक्री येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक शिक्षक संघ सभा उत्साहात

  • By admin
  • August 14, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

नंदुरबार ः साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक शिक्षक संघ सभा संपन्न झाली.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पालक शिक्षक संघाची आमसभा शाहू सभागृहात संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर नेरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे, प्रमुख पाहुणे प्रभाकर नेरे यांच्यासह उपप्राचार्य प्रतिभा शिवदे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सीलाल बागुल, सतीश सोनवणे तसेच पालक नम्रता भामरे, दादा राजपूत, सीतामाता वस्तीगृह अधीक्षक प्रज्ञा पाटील, उर्मिला भामरे, रायगड वस्तीगृह अधीक्षक जयप्रकाश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

त्यानंतर संगीत शिक्षक व त्यांच्या समूहाने सब मिलकर करते है स्वागत गीत सादर केले. तसेच दयानंद बोरसे यांनी शैक्षणिक परिवार व परिसरातील तसेच समाजातील मृत पावलेले ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात केली. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलास गोसावी यांनी प्रास्ताविक सादर केले. या सभेमध्ये माजी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर नेरे यांना निरोप देऊन नवीन कार्यकारिणीत प्रतिभा भामरे यांना उपाध्यक्ष तर दादा राजपूत यांना कार्यकारणी सदस्य करण्यात आले.

तसेच विद्यालयाचे शिक्षक सुरेश मोहने यांनी सभेत यश निवड संदर्भात अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यात विद्यालयाचे उपशिक्षक बन्सीलाल बागुल यांची व सतीश सोनवणे यांची पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाली. प्रसादचंद्र भाडणेकर हे राज्य खो-खो पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले. तसेच यामिनी सोनवणे ही विद्यार्थिनी तालुका विज्ञान मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हा परीक्षेसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी शिक्षक व विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले.

सुनंदा शिंगाणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले व ठराव सर्वानुमते मंजूर झाला. कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता वाढ संदर्भात राबविण्यात येणारे विविध उपक्रमाबाबत उपप्राचार्य प्रतिभा शिवदे यांनी अहवाल सादर केला. माध्यमिक विभागातील विद्यार्थी गुणवत्ता वाढ संदर्भात व विविध उपक्रमांबाबत पर्यवेक्षक अविनाश सोनार यांनी अहवाल सादर केला. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विविध उपक्रमांची माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापन प्रक्रिये सोबतच पालकांचा सक्रिय सहभाग असणे बाबत अध्यक्षांनी पालकांना आवाहन केले. तसेच ते पुढे म्हणाले की विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे, सचिव अनिल सोनवणे, विश्वस्त गजेंद्र भोसले, दीपक अहिरराव, संजीव पाटील, यू एल बोरसे व सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य अर्थात संस्था शाळेला वेळोवेळी मदत सहकार्य व मार्गदर्शन करतात. शेवटी ते म्हणाले की शेतकरी उत्तम पीक येण्यासाठी शेती उत्तम प्रकारे करतो, म्हणून,शाळा हीच माझी शेती आहे असे ते म्हणाले. त्यानंतर वैशाली खैरनार यांनी आभार व्यक्त केले व संगीत शिक्षक योगेश निकुम यांनी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश बेडसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *