< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); हसन जामा खान यांना पीएच. डी. पदवी प्रदान – Sport Splus

हसन जामा खान यांना पीएच. डी. पदवी प्रदान

  • By admin
  • August 15, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हसन जामा खान युसुफ अली खान यांना पीएच डी पदवी प्रदान केली आहे.

हसन जामा खान यांना शारीरिक शिक्षण या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच. डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ” EFFECT OF SAQ DRILLS ON THE PERFORMANCE OF CRICKET PLAYER’S” असा असून यात वेग, चपळता आणि जलद हालचाल (Speed, Agility, Quickness – SAQ) प्रशिक्षणाचा क्रिकेटमधील विविध कामगिरीच्या निकषांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला आहे.

हे संशोधन एमएसएम कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राध्यापक डॉ मुरलीधर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. पीएच डी पदवी यशस्वी वायवा व्होसे परीक्षेनंतर प्रदान करण्यात आली, त्यामध्ये उमेदवाराने तज्ज्ञांच्या समितीसमोर आपले संशोधन प्रभावीपणे सादर केले. या समितीचे अध्यक्ष प्रा के बी झरीकर या होत्या. हसन जामा खान युसुफ अली खान हे सध्या डॉ रफीक झकेरिया कॅम्पस, मौलाना आझाद आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज येथे शारीरिक शिक्षण विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्राचार्य डॉ मझहर अहमद फारूकी यांनी त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *