
विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्मृती चषक जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
सोलापूर ः विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड व सृष्टी गायकवाड या बंधू भगिनींनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मानसने सहा पैकी सहा गुण तर सृष्टीने चार पैकी चार गुण मिळवले. तसेच श्रेयस कुदळे, सान्वी गोरे, नियान कंदीकटला, उत्कर्षा लोखंडे यांनी अनुक्रमे १३ व ९ वर्षाखालील गटात जेतेपद पटकाविले.
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सुशील रसिक सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, मुख्याध्यापिका रोहिणी सुरा, आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी एक हजार रुपये रक्कम देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक व मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, जयश्री कोंडा, यश इंगळे, प्रज्वल कोरे, पद्मजा घोडके, श्रीराम घोडके यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
नांदेड येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलांच्या गटात मानस गायकवाड, सानिध्य जमादार, आरुष कंदले, हर्ष हलमल्ली तर मुलींच्या गटात सृष्टी गायकवाड, श्रेया संदुपटला, स्वराली हातवळणे, श्रावणी देवनपल्ली यांची तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलांच्या गटात श्रेयस कुदळे व ओम राऊत तर मुलींच्या गटात सान्वी गोरे व पृथा ठोंबरे यांची निवड झालेली आहे. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मधील उत्कृष्ट खेळाडू, अंध खेळाडू योगीराज धनवे तसेच शेटे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेस उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा यशस्वितेसाठी डॉ. राधिकाताई चिलका, आ. देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, प्रा. विलास बेत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय)
१९ मुलांचा गट : मानस गायकवाड, आरुष कंदले, हर्ष हलमल्ली, प्रसन्न जगदाळे, विठ्ठल येलदी, जय अनेराव, वेद आगरकर, प्रतीक नामदे, नरसिंमा सिंग्रल.
मुलींचा गट : सृष्टी गायकवाड, श्रेया संदुपटला, स्वराली हातवळणे, श्रावणी देवनपल्ली, वैष्णवी येलदी, वेदिका घोळवे, फराह शेख, जयश्री कुबडे, दूर्वा महिंद्रकर, फिजा शेख.
१३ वयोगट मुले : श्रेयस कुदळे, ओम राऊत, साईराज घोडके, वेदांत मुसळे, हर्ष जाधव, सार्थक राऊत, देवदत्त पटवर्धन, आयुष जानगवळी, श्रीराम राऊत, जय तुम्मा.
मुलींचा गट : सान्वी गोरे, पृथा ठोंबरे, संस्कृती जाधव, अनन्या उलभगत, सृष्टी मुसळे, सिद्धी देशमुख, प्रतीक्षा चाबुकस्वार, दूर्वा नवले, तेजल चीलगुंडे, आदिती इनानी.
९ मुले : नियान कंदीकटला, प्रथम मुदगी, हिमांशू व्हनगावडे, प्रज्ञांश काबरा, अथर्व दनाने, मयूर स्वामी, विवेक स्वामी, हर्ष मुसळे, रत्नेश घाणेगावकर, स्वराज हंचाटे.
मुली : उत्कर्षा लोखंडे, ईशा पटवर्धन, श्रेया पैकेकरी, हर्षा क्षीरसागर, अन्वी बिटला, समृद्धी कसबे, ईशा केकडे, राई लोहार, तन्वी हरके, तन्वी बागेवाडी.
उत्तेजनार्थ बक्षिसे : १९ मुले : निखिल पवार, साईराज पवार. मुली : दिशा बरगजे, समृद्धी शिंदे. १३ मुले : सोहम सुरवसे, रियांश जवळकर. मुली : संस्कृती आडके. ९ मुले : रुद्र गोमदे, श्रवण मासाळ. मुली : आर्या डांगे, शिवन्या चव्हाण.