
छत्रपती संभाजीनगर ः वर्धा येथे नुकत्याच झालेल्या सीबीएसई राज्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या आर्चिस आठवले याने चमकदार कामगिरी नोंदवली. या कामगिरीमुळे आर्चिसची सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत आर्चिस आठवले याने उपांत्यपूर्व फेरीत युग पटानी (धुळे) याचा २-० असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत श्रीवर कुमारे (नागपूर) याचा ३-२ असा पराभव केला. अंतिम फेरीत आर्चिस रिशित बन्सल (पुणे) याच्याकडून ०-२ असा पराभूत झाला. १७ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत आर्चिस याने रौप्य पदक मिळवले असले तरी, त्याच्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळाले.
टीटीएसडब्ल्यूएचे अध्यक्ष नीलेश मित्तल; एमएसटीटीएचे व्यवस्थापकीय समिती सदस्य कुलजीत सिंग दरोगा, टीटीएसडब्ल्यूएचे सचिव विक्रम डेकाटे, टीटीएसडब्ल्यूएचे कोषाध्यक्ष राज जयस्वाल, टीटीएसडब्ल्यूएचे उपाध्यक्ष डॉ. सुरुद अन्नछत्रे, टीटीएसडब्ल्यूएचे उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी आणि इतर असोसिएशन सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले.