
सचिव भिकन अंबे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे येत्या २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पंढरपूर येथे पहिल्यांदाच राज्य स्केटिंग स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा नियोजित तारखेला होणार असल्याचे फेडरेशनचे सचिव भिकन अंबे यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूर येथे २४ ऑगस्ट रोजी होणाऱया राज्यस्तरीय रिले स्केटिंग स्पर्धेतील सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र तसेच सर्व प्रशिक्षकांना स्मृतीचिन्ह व टी-शर्ट देण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा नियोजित तारखेलाच आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही खोट्या माहिती किंवा अफवांकडे कृपया दुर्लक्ष करा. या स्पर्धेबाबत किंवा पुढील स्पर्धांबाबत अचूक माहितीसाठी थेट 9422203319 आणि 9168430000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सचिव भिकन अंबे यांनी केले आहे.