
साक्री (जि. नंदुरबार) ः साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या प्रसंगी दत्ता पॉवर इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रवीण सिंग, नवनिर्वाचित नगराध्यक्ष उषाताई अनिल पवार, चित्रपत दिग्दर्शक दीपक पाटील, चित्रपट निर्माता निलेश कुवर, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अनिल सोनवणे, ॲड गजेंद्र भोसले, दीपक अहिरराव, संजू पाटील, विश्वस्त उत्तमराव बोरसे, उज्वला बेडसे, लाला मोरे, सुनीता नाईक, सुनील साळुंके, डॉ डी डी खैरनार, पी बी नेरे, अश्विनी देसले, डॉ शितल नांद्रे, सोहम भोसले, मिलिंद पाटील, प्राचार्य प्रमोद बेडसे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, उपप्राचार्या प्रतिभा शिवदे, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सिलाल बागुल, सतीश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी रितेश दिवाकर नांद्रे याने दिनविशेष सादर केला. या प्रसंगी ध्वजारोहण झाल्यानंतर योगेश निकुंभ यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. या वेळी एनसीसी कमांडिंग ऑफीसर मनीष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विविध पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली. यात. एमसीसीचे पथक (मुली) प्रमुख वनमाला साळुंके, एमसीसीचे पथक प्रमुख (मुले) भूषण बोरसे, स्काऊट पथक प्रमुख अविनाश भदाणे, गाईडचे पथक प्रमुख तृप्ती ठाकरे, आरएसपीचे पथक प्रमुख (मुली) भारती चव्हाण, आरएसपीचे पथक प्रमुख (मुले) नितीन भामरे, बारावीचे पथक प्रमुख योगिता नांद्रे, शिवाजी देवरे आदी पथकांचा समावेश होता.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवकालीन १२ गड किल्ल्यांना युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस महाराष्ट्रातील ११ गड किल्याचे दर्शन “मान शिवबांचा-अभिमान महाराष्ट्राचा” या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या रांगोळीला साकारण्याचे काम चित्रकला शिक्षक हेमंत राठोड, राहुल बागुल, मयूर ठाकरे व छात्रालयातील विद्यार्थी यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना व युद्धात शहीद झालेल्या जवानांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, साक्री व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ऑपरेशन सिंधूर हे गीत सादर करण्यात आले. या गीतात एकूण १७५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या प्रसंगी प्रवीण सिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यालयास सोलर पॅनल बसविण्याचे जाहीर केले. तसेच दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवींद्र भामरे व सुरेश मोहने यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी आभार मानले.