
छत्रपती संभाजीनगर ः आझाद अली शाह शिक्षण संस्थेद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक आणि एमजीएम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची जयघोष आणि लेझीमच्या तालात प्रभात फेरी काढण्यात आली.
जिल्हा सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आता ऊर रहेमान अंबारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड येथील प्रसिद्ध कॉन्टॅक्टर मोहम्मद इलियाज हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मदरसा इमदादियाचे नाजीम मुफ्ती महेफुज ऊर रहेमान व महंमद माजिद हे उपस्थित होते. यावेळी शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अमरीन खान व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख जकेरिया तसेच इतर सर्व शिक्षक असंख्य पालक महिला व पुरुष उपस्थित होते.
यावेळी शाळेतील सहशिक्षिका शुभांगी कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि पाहुण्यांचे शाल व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सहशिक्षिक दिनेश म्हस्के यांनी संस्थेचा व शाळेचा परिचय करून दिला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी प्रास्ताविकामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन शाळेविषयी व संस्थेविषयी संपूर्ण माहिती दिली व त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश दिला व समाजातील चांगल्या लोकांचे आदर मानसन्मान करण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफरीन खान यांनी केले तर आभार प्रदर्शन बुराणा पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी खान मदिहा, वैशाली दाभाडे , आशा ढोकणे, शेख झीनत, धनश्री खिल्लारे, खान सुमैया, निलोफर शेख, दीपाली दळे, शेख सुमैय्या, पूजा जाधव, खान रिदा, आरीफ शेख, नफिसा खाला, सलमा खाला आदींनी परिश्रम घेतले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.