बीड ः बीड येथील मोरया क्रीडा मंडळ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बालेवाडी पुणे येथे १२ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी फुटबॉलच्या स्पर्धा २२ ते २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. १२ वर्षांखालील गटात २०१३, २०१४, २०१५ या वर्षात जन्मलेले खेळाडू सहभागी घेऊ शकतात. १७ वर्षांखालील गटात २००८, २००९, २०१० आणि २०११ या वर्षातील जन्मलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात.
पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात बीड जिल्हा संघाने महाराष्ट्रातून प्रथम आणि मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला होता. या वर्षी देखील यशाची परंपरा कायम राखण्याचा मानस बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचा आहे. रविवारी सकाळी १० वाजता मोरया क्रीडा मंडळ, महाराष्ट्र दरबार हॉटेलच्या बाजूला, तुळजाई चौक, नाट्यगृहाच्या जवळ बीड येथील मैदानावर निवड चाचणी स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी रग्बी असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन येळवे (8208444836) यांनी एक समिती तयार केली आहे. या समितीचे प्रमुख शोएब खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली १७ वर्षांखालील गटासाठी ओंकार मोरे, सुरज येडे, ईश्वर कानडे हे निवड समितीचे सदस्य असतील तसेच अशोक चौरे यांच्या अध्यक्षतेखाली १२ वर्षांखालील गटातील निवड समितीमध्ये आकाश खांडे, संदीप वाडमारे, अदिती लोंढे, राधा दिवे यांचा समावेश आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे आणि सर्व रग्बी असोसिएशन बीड पदाधिकारी यांनी केले आहे.